महाकुंभात आतापर्यंत १३ कोटींहून अधिक भाविकांचे पवित्र स्नान.


मारुती देवकर

27 Jan 2025 02:05 PM
   

  सांगली :- प्रतिनिधी 27/01/2025

महाकुंभात आतापर्यंत १३ कोटींहून अधिक भाविकांचे पवित्र स्नान
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. देशभरासह परदेशातून देखील असंख्य भाविक रोज प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान आज ४६ लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणीत पवित्र स्थान केले. तर १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात १३. २१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमात स्‍नान केल्‍याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (दि.२७) महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत. ते पवित्र त्रिवेणी संगमात स्नान देखील करणार आहेत. यासोबतच ते उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान ते कुंभमेळ्यातील सहभागी संत आणि ऋषींनाही भेटणार आहेत. गृहमंत्री अमित शहा सुमारे ६ तास महाकुंभमध्ये सहभागी असणार आहेत, अशी माहिती देखील समोर येत आहे. 
तत्पूर्वी इंडिया आघाडीतील प्रमुख नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी (दि.२७) प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केले होते. अखिलेश यांनी पवित्र त्रिवेणी संगमात ११ वेळा डुबक्या मारल्याचे वृत्त देखील समोर आले होते. १३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू झालेला महाकुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

=========================

    Post Views:  92